सेवा निवृत्त मुख्याध्यापक श्रीराम वैरागडे यांचे निधन
प्रतिनिधी/पंकज नेहारे
मारेगाव शहरातील सुभाष नगर प्रभाग क्रमांक १७ येथील रहिवासी सेवा निवृत्त जिल्हा परिषद प्राथमिक मुख्याध्यापक श्रीराम वैरागडे यांचे वयाच्या ७९पार करू ८०व्या वाढदिवशी ६ ऑगस्ट रोजी निधन झाले आहे. ते संस्था संघटना व आंबेडकर
चळवळशी निगडित होते. त्यांच्या पश्चात पत्नी,३मुली, ज्येष्ठ पत्रकार मुलगा नरेंद्र वैरागडे असा आप्ते परिवार त्यांच्या पाठीमागे आहे. सुभाष नगर येथून अंत्यविधी आज सकाळी १०च्या दरम्यान मारेगाव येथे मोक्षधाम येथे करण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र वैरागडे यांनी दिली.