Type Here to Get Search Results !

केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली प्राध्यापिकेची १० हजारात ऑनलाईन फसवणूक

केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली प्राध्यापिकेची १० हजारात ऑनलाईन फसवणूक


जळगाव,दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे घडत असतांना  एसबीआय बँकेत केवायसी अपडेट करण्याचे सांगून ऑनलाईन लिंक व ओटीपीच्या माध्यमातून एका प्राध्यापिकेची १० हजारात फसवणूक केल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीला आली. याप्रकरणी काल गुरूवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता अज्ञात व्यक्तीवर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुपमा प्रभात चौधरी (वय ५२,  रा. गजानन कॉलनी जळगाव) ह्या केसीई आयएमआर महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून नोकरीला आहे. बुधवार ४ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्या आयएमआर कॉलेजमध्ये असतांना त्यांना एका अनोळखी नंबरवरून मॅसेज आला. बँकेत केवायसी अपडेट करण्यासंदर्भात एक लिंक पाठविली. या  लिंकवरून अज्ञात व्यक्तीने अनुपमा चौधरी यांच्याकडून पासवर्ड  आणि ओटीपी नंबर घेतला.


त्याच दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खात्यातून १० हजार रूपये परस्पर काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच  चौधरी यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. चौधरी यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies