सोनाराला लुटले पाच लाखांचे सोने, जबर मारहाण,
औरंगाबाद-पुणे महामार्गावरील तिरुमला ऑईल मिल जवळील घटना
गंगापूर : दुचाकीवरून जाणाऱ्या सोनारास जबर मारहाण करून पाच लाख रुपयांचे सोने लुटून नेले यात सोनार गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.औरंगाबाद पुणे महामार्गावरील तिरुमला ऑईल मिल जवळील घटना. औरंगाबाद पुणे महामार्गावरील भेंडाळा फाटा जवळील तिरुमला आँईलमिल जवळ तिघांनी दुचाकीवरून जाणाऱ्या सोनारास जबर मारहाण करत त्यांच्या जवळील सोने, चांदी व पैशाची बॅग, असा ५ लाख रुपयांचा ऐवज हिसकावून पोबारा केला. ही घटना गुरूवारी ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. बॅग लूटप्रकरणी अज्ञात तीन संशयित आरोपींविरूध्द गंगापूर पोलिस ठाण्यात तिघांवर रस्ता लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून विजयकुमार लक्ष्मण डहाळे (वय ३६) (रा. नवीन कायगाव, ता.गंगापूर) यांचे औरंगाबाद पुणे महामार्गावरील ढोरेगाव येथे सोन्या-चांदीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते कायगाव येथून सकाळी भेंडाळा, ढोरगाव येथे दुकानावर गेले होते. दुकानाचे कामकाज आटोपून संध्याकाळी सहा साडेसहाच्या सुमारास दुकानातील सर्व सोन्या-चांदीचे दागिने व पैसे घेऊन ते त्यांच्या घराकडे जात असताना तिरूमला ऑईल मिल जवळ त्यांना अडवून डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण केली. डोक्याला जबर मार लागल्यामुळे ते खाली पडले असता, त्यांच्या जवळील ऐवज असलेली बॅग लुटून नेली. यानंतर कुमार डहाळे यांनी रात्री उशिरा गंगापूर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. सदरील घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप गावित पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांनी भेट दिली.