विवाहित महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
संशायित आरोपी मोकाट
मारेगाव शहरातील घटना
प्रतिनिधी /पंकज नेहारे
मारेगाव शहरातील प्रभाक क्रमांक चार मधील घराच्या दरवाजा मध्ये उभी असलेल्या ३०वर्षीय विवाहित पिडीत महिलेला एका ३५वर्षीय इसमाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना काल दि.५ ऑगस्ट रोज गुरुवार रोजी रात्रीच्या ९च्या सुमारास संशायित आरोपी विकास मोहितकर पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादी वरून ३५४,३५४(अ)(१),(२),(४)३२३,५०६मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. सध्या तरी संशायित आरोपीला पोलिसांनी अटक केली नसल्याने पिडीत महिलेला संशायित आरोपी पासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील पिडीत महिला घराच्या दरवाजात उभी असताना प्रभाग क्रमांक पाच मधील संशायित आरोपी विकास मोहितकर पिडीत महिलेच्या दारावर येवून महिलेकडे शरीर संबंधाची मागणी करुन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पिडीत महिलेने मारेगाव पोलीस स्टेशन गाठत संशायित आरोपी विरूद्ध तक्रार दिली या घटनेचा तपास मारेगाव पोलीस करत आहे.