मारेगावात बोलेरो-दुचाकीचा भिषण अपघात; दोघे गंभीर जखमी
मारेगाव/प्रतिनिधी
पंकज नेहारे
मारेगाव - बोलेरो वाहनाचा व दुचाकीच्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असुन. ही घटना शुक्रवारी पाचच्या सुमारास वणी मारेगाव मार्गावरील एका बार जवळ घडली. या अपघातात दोन जण गंभीर झाले आहेत. प्रवीण अशोक पारखी वय वर्ष २८ रा चिखल वनोजा ता.वरोरा आणि विठ्ठल रामदास जीवतोडे रा देहगाव (कुंभा) अशी जखमीची नावे आहेत. या दोन्ही जखमींना उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल असता नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर बघण्यासाठी गर्दी केली होती.
या दोघांवर मारेगाव ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी दोघांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे मारेगाव येथील दोघे एका मयतीसाठी झाले होते.
दुचाकीने (क्र. एम. एच. ३४ बि क्यू २७६५) मयत करून नातेवाईका कडे पाणी पिण्यासाठी जात असताना वणी मारेगाव रोडवर. तर बोलेरो (क्र. एम.एच. ३४ के. ६५१६) ही गाडी मारेगाव वरुन वणी येथे जात होती.
वणी मारेगाव मार्गा जवळ दोन्ही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकी चालक प्रविण पारखी व विठ्ठल जीवतोडे हे दोघे गंभीर जखमी झाले. या दोघांना पुढील उपचारासाठी चंद्रपुर येथे उपचारासाठी उपचारासाठी दाखल करण्यात आहे.