अक्कलकुवा तालुक्यातील जामली येथील एकाच घरात चार पशुधनाचा मृत्यू
प्रतिनिधी/ रविंद्र पाडवी
मोलगी ( प्रतिनिधी) नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यांमध्ये आताही कोणत्याही प्रकाराची सोय नाही म्हणजेच अशीच एक घटना घडली आहे ती घटना ही हादरून जाण्यासारखी आहे म्हणजे अक्कलकुवा तालुक्यातील जामली या गावात पशू वैद्यकीय अधिकारी कोण आहे .
हे सुद्धा लोकांना माहिती नाही आज झी घटना घडली आहे यांची सर्व जबाबदार म्हणजे येथील नियुक्त केलेले पर्यवेक्षक व पशू वैद्यकीय अधिकारी हे जबाबदार आहे कारण हे अधिकारी यांनी वेळवर पशु लसीकरण केले असते तर अशी घटना घडली नसती एका पाठ पाठ चार गुरे दगावले आहे यांना लोकांना नुकसान भरपाई मिळेल का? या गरीब शेतकरी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे तसेच सदर घटना ही वाह-या पुनया तडवी रा जामली का येथे घडली आहे तरी सदर परिसरात नेमलेल्या पशू वैद्यकीय अधिकारी यांनी तात्काळ संपर्क करून पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवुन द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांची केली आहे.