कोलगाव येथे शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
पंकज नेहारे
मारेगाव :- तालुक्यातील कोलगाव येथील १५जुलै रोजी शेतकऱ्याने स्वतःच्या शेतामध्ये विष प्राशन केल्याची घटना घडली होती सुनिल आनंदराव गारघाटे रा. कोलगाव असे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचे नाव असुन त्यांना उपचारासाठी सुगम हॉस्पिटल येथे १५जुलै रोजी दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान आज दि.२०जुलै रोजी सकाळी ८वाजतच्या दरम्यान मुत्यु झाला
कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी सरकारची धोरणे यामुळे शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. तालुक्यातील दोन महिन्यापासून अंदाजे ७ कर्जबाजारी शेतक-यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवल्याचे समोर आले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा दुष्काळाच्या झळा सोसतो आहे. येथील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. गेल्या तीन-चार वर्षापासून निसर्ग साथ देत नाही, कधी उत्पन्न चांगले झालेच तर सरकारची धोरणे आडवी येतात. त्यामुळे येथील शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या डोंगराखाली जग त आहे.
यादरम्यान, गारघाटे यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. सुनिल यांच्या पश्चात पत्नी, व दोन मुली असा आपत्य परिवार पाठीमागे आहे.