बोटोणी जगन्नाथ महाराज मंदिर परिसर जलमय
-अनेक घरात शिरले पावसाचे पाणी
- अनेकांचे भांडे तरंगले
- नागरिकांची त्रेधातिरपट
बोटोणी : जयप्रकाश वनकर
चार ते पाच दिवसाच्या उसंती नंतर काल रविवार ला आलेल्या मूसळधार पावसाने बोटोनी वासीयांचे चांगलेच हाल झाले. वार्ड क्रमांक एक मधील मंदिर परिसरात उपाय योजनेच्या अभावामुळे बहुतेक लोकांच्या घरात पाणी साचले घरात दोन फुटापर्यंत पाणी साचल्याने घरातील भांडी कुंडी तरंगायला लागली. अनेकांची त्रेधातिरपट उडाली. स्थानिक प्रशासनाने लक्ष देऊन उपाय योजना करन्याची मागणी ग्रामस्थांकडून पुढे येत आहे.
मागील परिस्थितीचा अनुभव लक्षात घेता राज्य मार्ग क्रमांक ६ वरील पुलामधून पाण्याचा विसर्ग करायला पाहिजे होता. परंतु भविष्यातील परिस्थितीला समजून न घेता पुलाचे बांधकाम करण्यात आले.तत्कालीन वेळी असलेल्या ग्राम प्रशासनाने योग्य नियोजन न केल्याने ही भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचे ग्रामस्थांना कडून बोलल्या जात आहे.साध्यस्थित येथील जगन्नाथ महाराज मंदिर व काही घरांना पाण्याने विळखा घातला आहे.अनेकांची भांडी तरंगले तर रात्रभर घरात शिरलेल्या पाण्यात नागरिकांची त्रेधातिरपट उडाली त्यामुळे आता तरी समोरील संभाव्य धोके लक्षात घेता योग्य नियोजन करून पावसाच्या पाण्याचा विसर्ग करण्यात यावा.अशी मागणी सबंधित ग्रामवासीयांकडून करण्यात येत आहे.