राज्यातील सलून कारागीरांनी युनियनच्या माध्यमातुन संघटीत होणे काळाची गरज.... राष्ट्रीय जनसेवा पक्ष.
इतर कामगारांप्रमाने सलून कामगाराला ही सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व सलून व्यवसायिक आणि कारागीर युनियनच्या माध्यमातून एका छताखाली संघटीत होणे अत्यंत गरजेचे आहे,असे परखड विचार ज्येष्ठ विचारवंत,लेखक,प्रबोधनकार, कामगार नेते आणि सत्य शोधक समाज युनियनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.शरद तायडे साहेब यांनी राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या चर्चा सत्रात व्यक्त केले.
राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. महाविरजी गाडेकर साहेब यांच्या आदेशानुसार सलून व्यवसायिक आणि कारागीर यांच्या मूलभूत समस्यांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय जनसेवा पक्षाद्वारे एका आज एका चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते,या प्रसंगी श्री.तावडे साहेब बोलत होते.
राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे उपाध्यक्ष श्री.संजय पंडित,ज्येष्ठ सल्लागार श्री.शेखर भोर काका आणि ठाणे जिल्हा कार्यकारीनीतील ज्येष्ठ सल्लागार श्री.तुकाराम सोनवणे साहेब या चर्चा सत्रात सहभागी झाले होते.
राज्यातील इमारत बांधकाम कामगार,फेरीवाले यांच्यासारख्या असंघटित कामगारां प्रमाणे सलून कारागिरांनाही मूलभूत हक्क आणि शासकीय सुविधा मिळवून देण्यासाठी सर्व सलून करागीरांना लवकरच समाजातील विविध मान्यवर बांधवांच्या सहकार्याने युनियनच्या माध्यमातून एकाच छताखाली संघटीत करून त्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येतील, असे मत राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे उपाध्यक्ष श्री संजय पंडित यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे ज्येष्ठ सल्लागार श्री.शेखर भोर काका आणि श्री.तुकाराम सोनवणे साहेब यांनीही सलून करागीरांना भेडसावणारे विविध प्रश्न उपस्थित करून श्री तायडे साहेब यांच्याशी साविस्त चर्चा केली.
नाभिक समाजाचा पारंपरिक सलून व्यवसाय टिकविण्यासाठी आणि व्यवसायात विविध कारणांनी आलेल्या अडचणी दूर करून आधुनिकता आणण्यासाठी व्यवसायिक आणि कारागीर एकच छताखाली येणे खुप गरजेचे आहे असे मार्मिक विचार श्री भोर काका यांनी मांडले.
आज नाभिक समाजात आणि सलून व्यवसायात विविध संघटना आणि असोसिएशन कार्यरत आहेत,परंतु असोसिएशन आणि फेडरेशन नाभिक कारागिरांचे दुकानदारांचे कामगार कायदेविषयक प्रश्न सोडविण्यासाठी नियमानुसार पुरेसे सक्षम नाहीत. तसेच समाजातील एकात्मते अभावी सलून व्यवसाय सध्याच्या स्पर्धेच्या युगात मागे पडताना दिसत आहे,याची खंत ठाणे जिल्हा सल्लागार श्री सोनवणे साहेब यांनी व्यक्त केली.
पारंपरिक सलून व्यवसाय आणि कारागीर टिकविणे हे सर्वात मोठे आव्हान आज नाभिक समाजापुढे आहे,वर्षानुवर्षे सलून काम करणाऱ्या कारागीरांच्या मूलभूत प्रश्नांकडे आजवर कुणीही फारसे लक्ष दिलेले नाही,
कुशल कारागीरा प्रमाणे बारा तास काम करूनही सलून करागीराला आजही त्याचा पुरेसा मोबदला मिळत नाही,
शासनाकडून देखील कसलेही प्रोत्साहन आणि सुविधा मिळत नसल्याने सलून कारागीर अतिशय हलाखीचे जीवन जगत आहेत, यावर सर्वांचे एकमत झाले.
इतर कामगारांप्रमाने आणि असंघटीत कामगार कायद्याच्या तरतुदी नुसार सलून कारागिराला सुद्धा पेन्शन योजना,वैद्यकीय सुविधा आणि इतर शासकीय सुविधा मिळणे गरजेचे आहे,
त्यासाठी युनियन सारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही असे संजय पंडित यांनी सांगितले,
सर्व असंघटित सलून कारागिरांना आणि सलून व्यवसायिकांना युनियन च्या माध्यमातून संघटीत करून कामगार आयुक्तालयाच्या योजने नुसार सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी सर्वांनी संघटीत होऊन आपले हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करावा असे मार्मिक आणि महत्वपूर्ण आवाहन युनियनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते श्री.शरद तायडे साहेब यांनी शेवटी व्यक्त केले आणि सलून कामगारांच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले..