जमाना आश्रम शाळेत पालक सहविचार सभा संपन्न
रवींद्र पाडवी
मोलगी ( प्रतिनिधी) अक्कलकुवा तालुक्यातील जमाना येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत पालक सहविचार सभा मुख्याध्यापक बी. के. महिरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. कोविंड 19 विषाणूच्या प्रादुर्भाव आच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2021 22 मध्ये राज्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय अनुदानित आश्रम शाळा व एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल शाळेमध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक शा आ शा 2020/प्र. क्रमांक 122/दिनांक 26 जुलै 2021. राज्यातील कोविंड मुक्त क्षेत्रात दिनांक 2 ऑगस्ट 2021 पासून आश्रम शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात येत आहे ग्रामीण भागातील कोविंड मुक्त गावातील ग्रामपंचायतीने गावातील शाळेमधील इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून तसा ठराव करण्यासाठी आज पालकांची सहविचार सभा आश्रम शाळेत घेण्यात आली सहविचार सभेस माझी उपसरपंच ताप सिंग पाडवी प्राथमिक मुख्याध्यापिका एस. पी. बोरसे, जी. डी. बागुल, जे. आर. रामोळे, जय प्रकाश पाडवी, अनिल पाटील, दैदिप्यमान नेरकर, शकुंतला पाडवी, सुरसिंग पाडवी, उमेश सूर्यवंशी, संदीप पवार, संदीप पाटील, मुकेश बाविस्कर, ईश्वर परमार, दिलीप पाडवी, कांतीलाल वसावे, भाऊराव वाढाई, तुकाराम वसावे, माधुरी वसावे, सायसिंग वसावे, सुनील वसावे, ईश्वर वसावे, चेतन वसावे विमल वसावे, माधव पाडवी, व बहुसंख्य पालक सविचार सभेला उपस्थित होते