विवाहीत महिलेचा विनयभंग आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
कळंब तालुक्यातील घटना
कळंब (तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील कोठा (वेणी) येथिल आरोपी प्रफुल्ल किशोर शेंडे वय ३० वर्ष याने आदिवासी समाजाच्या १९ वर्षीय विवाहीत महिलेवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी आरोपीवर दि. २७ जुलै २०२१ रात्री ११.३० वाजता गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली.
प्राप्त माहिती नुसार यातील फिर्यादी विवाहीत महीला घरात रात्री एकटी झोपून असता आरोपी प्रफुल्ल शेंडे याने घरी कुणी नसल्याचे पाहून आरोपीने घरात घुसून महिलेचे तोंड दाबून घराबाहेर नेले व छाती दाबदुब करुन निघुन गेला. व कुणाला सांगशील तर जीवाने मारुन टाकीन म्हणून धमकी दिली होती. त्यानंतर आरोपीच्या धमकीला घाबरुन महिलेने घरी कुणालाच सांगीतले नाही तर त्यानंतर ती नवरा दारु पित असल्याने माहेरी निघुन गेली. तेंव्हा आरोपी प्रफुल्ल हा अन्याय ग्रस्त महीलेच्या आईचे मोबाईल वर वारंवार फोन करुन पाठलाग करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यानंतर सदर विवाहीत महीला दि. २७ जुलै रोजी कोठा येथे पतीच्या घरी आली व आरोपीच्या त्रासाला त्रस्त होऊन सदर तीन महिन्यापुर्वी घडलेली घटना सासु, साऱ्याला सांगीतली असता कळंब पोलीस स्टेशन मध्ये येऊन आरोपी विरोधात जबानी रीपोर्ट दिल्याने पोलीस निरीक्षक अजित राठोड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु साळवे यांनी प्राथमिक तपास करुन आरोपीला अटक केली. व आरोपीवर कलम ३५४,३५४(अ) ३५४(ड), ४५२,५०६ भादवि प्रमाणे तर कलम ३(१), (w), (११), ३(१), (v/१.. (१) प्रमाणे गुन्हा नोंद करुन पुढील तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी आरोपीला यवतमाळ येथे सोबत नेल्याचे समजले.