रिलायन्स पेट्रोल पंपकडून कोविड_रुग्णवाहिकेसाठी निःशुल्क इंधन पुरवठा
मारेगाव वार्ता/प्रतिनिधी
हिंगणघाट
सचिन महाराज
मो.9765486350
वर्धा दि, १९ :- रिलायन्स पेट्रोलियम कंपनीचे जिल्ह्यातील पुलगाव आणि हिंगणघाट या दोन पेट्रोल पंप धारकांनी जिल्ह्यात कोविड १९ रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या रुग्णवाहिका, मेडिकल ऑक्सिजन वाहतूक करणारी वाहने आणि अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने या वाहनांकरिता निःशुल्क इंधन देण्याचा उपक्रम सुरू करून केला आहे अशी माहिती आदित्य पाटणी आणि किशोर नायडू यांनी दिली.
रुग्णवाहिका आणि मेडिकल ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांनी सदर वाहन त्या सेवेसाठी वापरले जाते याचे प्रमाणपत्र जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग किंवा पोलीस विभागाकडून प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्र असणाऱ्या वाहनाना पुलगाव येथील पाटणी पेट्रोलियम, वर्धा रोड आणि हिंगणघाट येथील रिलायन्स बी पी मोबिलिटी लिमिटेड, एन एच 7 हैद्राबाद - नागपूर हायवे हिंगणघाट या दोन पेट्रोल पंपवर निःशुल्क पेट्रोल- डिझेल उपलब्ध करून देण्यात येईल असे श्री पाटणी आणि श्री नायडू यांनी सांगितले.