प्रभाग क्रमांक सहा मध्ये पाणी पेटले !
- नगरपंचायत प्रशासनच्या बेताल भूमिकेने प्रभाग क्रमांक सहा मध्ये जल संकट
नगरपंचायत मुख्यधिकारी यांना निवेदन
मारेगाव : पंकज नेहारे
मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक सहा येथे नगरपंचायत प्रशासनाच्या बेताल भूमिकेचा परिपाक समोर आला आहे. भर मे महिन्याच्या रखरखत्या उन्हामध्ये प्रभाग क्रमांक सहाच्या नागरिकांना पुरते जलसंकट ओढावले आहे.त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.
प्रभाग क्रमांक सहामध्ये एक हजारचे आसपास असलेल्या लोकसंख्येला पाण्याने पुरता हरताळ माजविला आहे.यावर प्रशासकीय अधिकारी उघड्या डोळ्यांनी पाण्यासाठी जनतेचे हाल पहात आहे.नागरिकांनी याबाबत विचारणा केल्यास उडवाउडवीचे उत्तरे देवून वेळ मारुन नेत असल्याचा आरोप होत असुन प्रभाग क्रमांक सहाच्या नागरिक मात्र पाण्यासाठी बेहाल होत आहे.
येथील दोन हातपंप असुन दोन्ही हातपंप सुरु आहे.यातील हे दोन्ही हातपंप अखेरच्या घटका मोजत असल्याचे वास्तव आहे. स्थानिक प्रशासन मागील अनेक दिवसापासून कुंभकर्णी झोप घेत मुग गिळून आहे.या समस्येने नागरिकांची पुरती वाट लागुन तप्त उन्हात ससेहोलपट होत आहे.
प्रभाग क्रमांक सहा मधील दोन हातपंप असुन त्यामधून पाणी सोडले जाते.मात्र पुरवठा करणारी यंत्रणा येथे कुचकामी ठरत असल्याने पाण्याचा स्रोत अत्यल्प प्रमाणात याचा फटका नागरिकांना बसत असल्याचा टाहो फुटत आहे.त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी त्रेधातीरपट उडून झुंबड उडते आहे.पाण्यासाठी होत असलेला संघर्षाला पुर्ण विराम देण्यासाठी बेताल प्रशासन व अधिकारी चुप्पी साधून आहे.काही कर्मचारी उंटावरुन शेळ्या हाकलीत नागरिकांच्या मुलभुत गरजेवर सपशेल नापास झाल्याने सर्वत्र संताप प्रशासनाप्रती व्यक्त होत आहे.
मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक सहा येथील ऐन उन्हाळ्यात नगरपंचायत प्रशासनाच्या नियोजनशुन्याने नागरिकांची वाट लागुन पाणी पेटले आहे.त्यामुळे नागरीकांचे बेहाल होत असुन संतापलेल्या नागरिकांकडुन मारेगाव नगरपंचायत मुख्यधिकारी यांना वरील समस्याचे निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित.
माधव कोहळे, गिरीधर राऊत प्रमोद पाटणकर, वसंतराव मिलमिले, प्रफुल्ल ठोंबरे, निलेश भेंडे, जिवन आवारी, दुष्यंत निकम पुरूषोत्तम गौरकार, शामल राऊत, मनिष दुगड , गणेश पेंदोर ,किशोर ठेंगणे ,यमन राऊत, उज्ज्वल जोगी