मारेगाव तालुक्यात ३४ पॉझिटीव्ह
- मारेगाव निरंक !
मारेगाव : सचिन मेश्राम
तालुक्यात आज शुक्रवारला कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढीत ३४ जन बाधीत केले.हा ग्रामिण भागातील आकडा असुन शहराला सलग सहाव्या दिवसाला शून्याची नोंद करीत दिलासा दिला.
कोरोना संसर्गाची कमी जास्त प्रमाणात घौडदौड कायम आहे.मागील तीन दिवसात हा आकडा अत्यल्प होता त्यामुळे नागरिकांनी काही प्रमाणात सुटकेचा श्वास घेतला.मात्र आज बाधितांच्या दुहेरी आकड्याने कोरोना संसर्गाने आपली दहशत अधोरेखीत केली.
दरम्यान आज प्राप्त अहवालात तालुक्यातील ग्रामिण भागातील बाधितांची संख्या अचानक फुगून ३४ वर गेली.मारेगावला मात्र पॉझिटीव्ह च्या नोंदीतून सलग सहाव्या दिवसाला निरंक आहे.आज बरे होवून घरी परतलेल्यांची संख्या ०९ आहे तर अँक्टिवचा आकडा आजही कायम फुगत तब्बल १७५ वर आहे.
परिणामी कोरोना संसर्ग मारेगाव तालुक्यात दबा धरुन बसलेला असतांना तालुक्यात आज बाधितांचा आकडा बराचसा फुगला आहे.अलीकडे मारेगाव शहरातील वाढत्या गर्दीने ग्रामिण भागातील आकड्याचे शहरामध्ये प्रामुख्याने बेरजेत तर रुपांतर होणार नाही ना? अशी संभाव्य शक्यता निर्माण झाली आहे.शहरात वाढत्या लोकसमूहावर प्रशासनाने अंकुश लावण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत व्यक्त होत आहे.