Type Here to Get Search Results !

आजीच्या हत्येचा कट, आरोपी नातीस अटक

आजीच्या हत्येचा कट, आरोपी नातीस अटक
प्रियकरही गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई
     प्रतिनिधी/विजय लोणारे
नागपूर प्रियकर आणी त्यांच्या साथीदाराशी संगनमत करून सख्या आजीची हत्या करणाऱ्या नातीला गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अमरावती येथून ताब्यात घेतले यावेळी पोलिसांनी नातीच्या प्रियकराच्याही मुसक्या आवळण्यात आल्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विजया पांडुरंग तिवलकर वय(६५)यांची.अज्ञात आरोपीने गुरुवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास गळा चिरून हत्या केली होती. पोलिसांचा तपास सुरू असताना नातेवाईक यांचे बयान घेवून  विजयाबाई जवळ नात राहत नसल्याने पोलिसांनी   प्रियकरासह त्यांच्या साथीदाराच्या मदतीने आजीची हत्या केल्याचे उघकीस आले.
विजयाबाई एसआरपीएफच्या निवृत्त कर्मचारी होत्या त्यांना एक मुलगा आणि दोन मुली असुन तिघांचेही लग्न झाले आहे. हे तिघेही नागपूरात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या परिवारासह राहतात वृद्ध विजयाबाई सप्तक नगरात एकट्याच  राहायच्या त्यांच्या मुलीची मुलगी तनू स्वैर वागत होती तिने आपल्या आईवडीलांचे घर सोडले होते ती आपल्या प्रियकरा सोबत आजी निवृत्त सरकारी कर्मचारी असल्याने तिच्या दहा ते पधरा लाख रुपये आणी दागिने असल्याचा अंदाज नितूच्या मनात निर्माण झाला होता. आजी एकटीच राहत असल्याने तिला संपवण्याचा विचार नितू करत होती. व आजीची हत्या करून पैसे व दागिने लुटता येईल आणी अवाजवी खर्च भागवता येईल यादृष्टीने तिने प्रियकर फैजानच्या मदतीने कट रचला त्यात प्रियकर फैजानचे साथीदार निलेश व प्रकाश पोनिकर बाबा उर्फ कदिर खान फरदिन खान आणी अरजु उर्फ मोहम्मद कमरे आलम यांना सहभागी करून घेतले१०ते१५लाख रूपये  मिळणार म्हणून विजयाबाईची हत्या  करण्यासाठी आरोपी सामील झाले होते पोलिसांनी शनिवारला रात्रीच्या सुमारास  चार आरोपीला शिताफीने पकडले तर त्याच्या जवळून दागिने व रोकडसह पकडे तर तनू आणि फैजान यांना अमरावती येथून अटक करून नागपूर येथे आणले असुन पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies