इंदिरा चौक मित्र परिवार तर्फे वणी शहरातील सॅनिटायझर फवारणी
प्रतिनिधी/वणी
सातत्याने वणी शहरात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने इंदिरा चौक, बेलदार पुरा, एकता नगर ,गुरू नगर व वणीतील काही दवाखाने येथे इंदिरा चौक मित्र परिवार कडुन स्वखर्चाने निर्जंतुकीकरण उपाययोजना सँनिटाजरची फवारणी करण्यात आली
असुन इंदिरा चौक मित्र परिवार कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी निर्जंतुकीकरण करण्यात आले. यावेळी उपस्थित पियुष चव्हाण, अमोल धानोरकर, राज चौधरी संग्राम गेडाम, तेजस ठमके, शुभम गेडाम आतिश मांडादे यांनी सँनिटाजर फवारणी साठी सहकार्य केले.